<*पिंपरी केंद्राचा बाल आनंदमेळावा जि.प प्राथ शाळा पवारवाडीच्या प्रांगणात उत्साहात संपन्न.*
पिंपरी केंद्राचा बाल आनंदमेळावा जि.प प्राथ शाळा पवारवाडीच्या प्रांगणात कोरेगाव पंचायत समितीचे सभापती *मा राजाभाऊ जगदाळे* , जि.प साताराचे सदस्य *मा. भिमराव पाटील*, प. स सदस्य मा. *सौ. शुभांगी काकडे* , गटशिक्षणाधिकारी मा. *श्रीकांत जगदाळे* , केंद्रप्रमुख *अंकुश जुनघरे*, केंद्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष *अनंत साबळे,*पवारवाडीचे *सरपंच मा. राजेंद्र पवार*व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष *मा.बाबूराव पवार*आदी मान्यवरांच्या उपस्थित उत्साहात संपन्न झाला .
*शिक्षक संघाचे राज्य संपर्क प्रमुख मा.सिध्देश्वर पुस्तके , प्राथ. शिक्षक बँकेचे चेअरमन बलवंत पाटील , व्हा. चेअरमन मोहन निकम ,धनसिंग सोनावणे,धनाजी पवार* यांनी बाल आनंद मेळाव्यास सदिच्छा भेट देवून विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रास्ताविकात बोलताना *मा.बजरंग वाघ* यांनी बाल आनंदमेळाव्यासाठी जि.प कडून येणाऱ्या अत्यंत कमी अनुदाना ची मान्यवरांना लक्ष माहीती देवून त्यामध्ये भरीव वाढ व्हावी अशी मागणी केली.बालआनंद मेळाव्यास उपस्थित सभापती मा.राजाभाऊ जगदाळे साहेब व जि .प सदस्य मा. भिमराव पाटील यांना शिक्षकांच्या बदल्या बाबत शासनाने घेतलेल्या नव्या निर्णयाची माहीती देवून पंचायत समितीने पाठवलेली यादी जि.प चे *उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवदास साहेब* यांनी रद्द केली असून त्यामुळे तालुक्यातील शिक्षकामध्ये बदल्याबाबत निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर होण्यासाठी पूर्वीपासून डोंगरी भागात मोडणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील जास्ती जास्त गावे दुर्गम अवघड या प्रकारात यावीत यासाठी मान्यवरांकडून जि.प व प.स मध्ये प्रयत्न व्हावेत अशी मागणी केली. व या वर्षी ९५ इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यानी जि. प शाळेत प्रवेश घेतला असून सर्व जि.प , प. स सदस्यांनी पालकांच्यात जागृती करुन जि.प शाळा टिकवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी बोलताना सभापती *मा.राजाभाऊ जगदाळे साहेब व जि .प सदस्य मा. भिमराव पाटील* यांनी *बाल आंनद मेळाव्याचे अनुदान १५००० रु इतके होण्यासाठी व कोरेगाव तालुक्यातील जास्ती जास्त शाळा अवघड, दुर्गम या प्रकारात मोडाव्यात यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले* बाल आनंद मेळाव्यात सहभागी सर्व विद्यार्थ्याचे कौतुक करुन जि.प शाळांचा पट वाढत असलेबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
सर्व मान्यवरांनी यांनी पवारवाडी शाळेने आयोजित केलेल्या कला कार्यानुभव प्रदर्शनाचे उद्घाटन केले व *सौ .गुलशन आतार* यांचे विशेष कौतुक केले .पवारवाडी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक *हारुन आतार* यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
बाल आनंद मेळाव्यास उपस्थित सर्व मान्यवर व सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांचे तसेच मा .भानुदास काकडे , काका कणसे आदी पवारवाडी शाला व्यवस्थापन समिती मार्फत स्वागत करण्यात आले.
बाल आनंद मेळाव्यातील सांस्कृतिक विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे अप्रतिम सूत्रसंचलन *सौ. जयश्री जगताप व सौ. मोहिनी घाडगे* यांनी केले . साऊंड व्यवस्थापन व व्यासपीठा वरील नियोजन अत्यंत प्रभावीपणे *रमेश राठोड , कृष्णाजी जाधव,प्रमोद मोरे , विलास वाघ ,मोईज महंमद , रियाज शेख , प्रविण गायकवाड , अनिल भोसले , वैभव खाडे, संतोष कोळी* यांनी केले
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी *दिलीप जाधव , दत्तात्रय कदम , अरुण सांळुखे, प्रविण घाडगे, विजय केंजळे , रामचंद्र देशमुख , संगीता नलवडे,जयश्री ताटे,कल्पना जाधव, रत्नप्रभा रासकर ,शिला क्षीरसागर,मानिषा केंजळे, ज्योत्स्ना माने, जयश्री भिंगारे, सुनिताभोसले, सुनिता सावंत , संगिता कदम, रुपाली भोसले , उज्वला जाधव, संगिता औंधकर,रवि माने, शामूबाई वाघ, शाहिस्ता तांबोळी* यांनी परिश्रम घेतले
Thursday, May 4, 2017
Subscribe to:
Post Comments (Atom)




No comments:
Post a Comment